Sunday, 24 July 2016

An article

गाडीतुन प्रवास करतांना जी पळणारी झाडे आपल्याला दिसतात, त्याचप्रमाणे आयुष्याची गाडी कधी वेगाने वळण घेते कळतच नाही. वेळ, पैसा, नातीगोती, मित्र, सम्बंध हरिणासारखे सुसाट दूर कुठेतरी पळून जातात. मग आयुष्य उरत ते फक्त संथ चालणाऱ्या श्वासासाठी आणि अंगात वाहणार् या रक्ताशी एकनिष्ठ होऊन शेवटच्या घटकेपर्यँत. समोरची झाडे दूर जाताना परत येण्याची आशा ठेऊन मी त्या खिडकीतून पाहयचो, पण ती मागे गेलेली झाडे मला कधी परत दिसलिच नाहीत.पुढे जातांना या निष्ठुर निर्दयी काळाने सगळे परतीचे रस्ते बंद करून एका अज्ञात अनोळखी ठिकाणी मला आणून ठेवले. जिथे या खोट्या आशेवर माणसाला फसवले जाते की, त्यांची इथे व्यवस्थित जडणघडण होईल.
           पण कशी ?  कुम्भाराच्या घागरिप्रमाणे, की शिल्पकाराच्या शिल्पाप्रमाणे, की चित्रकाराच्या चित्रा प्रमाणे ज्यावर खूप मेहनत  घेऊन त्याला रंग रूप आणि आकार दिला जातो.पण वास्तवात यातलं काहीच घडत नाही. इथे माणूस बनवणारे देव प्रत्यक्षात येत नाहीत ना माणसं घडवायला म्हणून असेल कदाचित.
                                   :- प्रफुल्ल म. शिंदे
                                       अकोला
               

No comments:

Post a Comment