Wednesday, 3 January 2018

Samarpan

आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना समर्पित :-

         "समर्पण"
एकदा सहज एक फुल
माझ्या ओंजळीत पडले
आणि म्हणाले,
" तरुणा जरा बघ माझ्याकडे
या ताज्यातवान्या सुगंधित पाकळ्या
फक्त काही वेळ, दुसऱ्यांसाठी
तुमच्यासाठी असलेले माझे हे अस्तित्व .
          निसर्गाच्या सानिध्यात
इतर फुलांसोबत डोलण्यासाठी,
गार वाऱ्याचा उपभोग घेण्यासाठी
आता मी नाही,
माझ्या जीवनाचा पुढील काही वेळ
तुमच्यासाठी .
           एक पूर्ण उमळलेलं फुल
त्याच ध्येय मातीत मिसळण्यासाठी
बलिदानाने मातीलाही सुगंधित
करण्यासाठी.
         हे समर्पण केवळ दुसऱ्यांसाठी!"

Chand

रात को एक चाँद मिला
वो भी आँखों से भिगा भिगा,
धीरे धीरे बादलों ने उसे
अपनी बाँहों मे ले लिया
मै आखरी तक उसको देखतां रहा ~

क्या फिर कभी वो दिखायी देगा ?
      मैंने अपने मन से पुछा
  तो अंदर से आवाज़ निकली -
              "नहीँ"
       मैं घबरा सा  गया
"क्यो आते है ऐसे चाँद जीवन मे"
कुछ पल की ख़ुशी देकर
सारी जिंदगी ग़मो के साये देते है

वैसे चाँद तो कल भी निकलेगा
बादल कल भी आयेंगे
वो फिर डूब जायेगा
कुछ पल की रौशनी देकर

पर वो चाँद सबसे अलग था
मासूम, भोला, चेहरे पर मुस्कुराहट
आँखों मे नमी, होंठों पे शबनम
वाह ! क्या बात थी यार.......

सोचते सोचते कब सूरज निकल आया
पता ही नहीँ चला.......

                          - प्रफुल्ल शिंदे

Viskatleli ratra

"विस्कटलेली रात्र"
अशा कितीतरी रात्री घालवल्यात मी तुझ्याबरोबर,
तुझे कुरळे केस कूरूवाळत,
तुझ्या अतीव सुंदर सजलेल्या
फुलागत चेहऱ्यावर स्पर्श करताना
मला म्रुगजळाचा भास व्हायचा
तुझ्या गोड गोष्टींनी मला
सर्व जग फिके वाटू लागले
चंद्राच्या सौम्य प्रकाशात
तलावाच्या काठावर बसून
भाकर्या खेळत  तासंतास गप्पा करत
ह्या रात्रीनी कधी मला तुझ्या प्रेमात पाडले
काही कळालेच नाही
मी ऊरलोच ना आता माझ्यात काही
तरीच तरीच तरीच
मी म्हणालो होतो माझ्याशीच
का वाटतंय हे सर्व जग मला आपलंसं
हों, आता जगावंस वाटतंय,
प्रत्येक रात्रीत तुझी सोबत असताना
पण, पण, पण,
एका रात्री,
जस सुसाट सुटलेल्या पिसाळलेल्या जनावराने
उभ्या पीकाची नासाडि करावी
तस विषारी सापाने डंख मारल्यागत
मला त्या स्वप्नातून जाग केलं
अन् समोर दिसलं ते फक्त भकास छप्पर
आणी उभ्या निर्जीव भिंती...........

               - प्रफुल्ल शिंदे
                     अकोला.

Prashnarthak prem

" प्रश्नार्थक प्रेम "

प्रेमाची व्याख्या...फारच कठीण असते ना ?  प्रत्येकाच्या तर्हेने वेगवेगळ्या भाषेत समंजसपने लिहिलेली वा समजून उमजलेली ही एक संज्ञा असते. पौराणिक कथांमध्ये ऐकलेल्या राजा राणीच्या प्रेमाच्या संज्ञा पाश्चिमात्य देशांत घडलेल्या रोमीओ ज्युलियट च्या प्रेमापेक्षा काहीतरी वेगळ्या होत्या.
         याउलट भारतीय प्रदेशात घडलेली लैला मजनु या प्रेमीयुगुलान्ची गाथा महाभारतातील राधाकृष्णानांच्या प्रेमाला तोड़ देतील इतकी अस्सल होती. हे झाल एका मर्यादित वर्गासाठि, बहुधा याला प्रेमापेक्षा आकर्षण म्हणणे सोईस्कर ठरेल, यात शंका नाही.
       एखाद मूल आई पासून दूर जात असेल त्यावेळी आईच्या काळजात होणारी घालमेल हे तीच त्या बळावरच आत्यंतिक प्रेम दाखवुन देत किंवा ती आई आपल्या बाळाला स्वतःपासून दूर न करण्यासाठी त्याला बिलगून बसते. हे प्रेमाच अस रूप आहे जे कोणत्याही प्रेमीयुगुलांच्या प्रेमापेक्षा कितीतरी पटींनी मोठं असतं.
              -प्रफुल्ल शिंदे

Jatiwad

"जातिवाद"

मी एकदा सभेत बोललो
जातिवाद अजूनही सम्पला नाही
तर माझ्यावर नाराजीचे सूर उठले
मी फक्त उल्लेख केला
संविधानातील समाजवादाचा
तर माझ्यावर तलवारी ऊपसल्या गेल्या
मग मी प्रतिप्रश्न केला त्यांना
हेच का आपल अभिव्यक्ती स्वातंत्र्य
कुठे हरवली समाज बांधिलकी
अरे विचारा जाऊन त्या लोकांना
ज्यांना दोन वेळच अन्न मिळत नाही
ज्यांना अजूनही आधुनिकता उमगली नाही
त्यांची काय परिस्थिती असेल
समोरची सभा अगदि शांत
जणू काही झालंच नाही या आविर्भावात
हक्क मिळत नसेल
न्याय मिळत नसेल
तर तो हिसकावुन घ्यावा
दीन, लाचार जगण्यात काय अर्थ
जातिवादावर राजकारण करून
मतान्ची दलाली मिळवनार्याँनो
आता वेळ आली आहे
'जातिवाद' मुळांपासून नष्ट करण्याची
तेंव्हा सज्ज व्हा !!!!

          - प्रफुल्ल शिंदे, अकोला

Alvida 1

कॉलेज कट्ट्यावर लिहिलेली कविता ..........
फॉर KK-series

"अलविदा"

जाने क्या साथ ले जायेंगे
जान यहीं पर छोडके
दिल दोस्ती दुनियादारी
सब रिश्ते बंधन तोडके (1)

साँस अटकी हैं मेरी इन
पत्थरों की दीवारों में
साथ बिताये चार साल
उन सभी मेरे यारो मे (2)

दिन जाने का खुदाने
गर तय किया होता
लौटकर आने का फिर
इरादा ना किया होता (3)

खयाल रखना दोस्तों
जिन्दगीका हँसते हंसते
कोई सफ़र जिंदगी का
चलना आहिस्ते आहिस्ते (4)

जाने का यहाँ से अब भी
कीसीका जी नहीँ करता
चलो कहे अलविदा यारो
वक्त तो कभी नहीँ ठहरता (5)

- प्रफुल्ल शिंदे

Khota paus

"खोटा पाऊस "

नजरेस आज तुझ्या
नजर लावताना
भटकलेच हे डोळे
तुझ्यात हरवताना

श्वास बंद व्हावा
काळीज धडधडावे
तुला दूर सारताना
मन का हे रडावे

मेघ गर्जना झाली
आकाशात वीज कडाडली
पाऊस बरसला नाही
मात्र ढग एकमेकांना भिडली

पाऊले पुढे सरकली
ती मागे फीरलीच नाही
वाटले एकदा तू बदलशील
तू मात्र बदललीच नाही

    -  Prafulla Shinde

Tere khatir

जल जायेंगे हम मर जायेंगे  
तेरे खातिर............
ना वजह तुम होगी ना हम
बस तेरा बेदर्दी प्यार और यह तनहाई
ख्वाबों से उलझती तेरी यादों ने
आँखों से टपकती इन आँसुओं ने
तेरे दिल से बस्स है इतना कहाँ ........

Tanhai

सोचा था जिसे सपनों में
किस्मत से ना पा सका
गुजरता हवा का झोका था वो
जिसे बाँहों में ना लिपटा सका.......

उसकी नज़रों ने घायल किया था
तनहाई, तनहाई दे गया बस वो......
-   प्रफुल्ल

Samarpit

"समर्पित"

गर्दीत माणसांच्या, दर्दीत वागलो मी
मर्जीत माणसांच्या, वर्दीत डागलो मी ....
        ना मज कुणाचा हेवा
        ना कुणाची किव आहे
        मीच साऱ्या दूनियेचा
        एक भुकेला जीव आहे
   ज्यांनी मजवर उपकार केलेत
   त्या सर्वांना अर्पित जाहलो मी
गर्दीत माणसांच्या दर्दीत  वागलो मी ..

Rang sananche

होळी स्पेशल ...............

    "रंग सणांचे"

शहरी साजरी होते
दिवाळी अन् नववर्ष
शेतकरी माझा करतो
फक्त पोळ्याला हर्ष (1)

शहरी होते होळी
रंगांची अन् गुललांची
गावी धुयमाती कधी
लाली पळसफुलांची (2)

अंगनाच्या वासासाठी
शहरी मूकलेत सारे
शेणाच्या सडयानं गावी
पसरलेत सुगंधी वारे (3)

नात्यांचेही रंग उधळन्या
यावे कधी कधी गावी
मनसोक्त मग हून्दडावे
मुक्त नदीच्या काठी  (4)

                   :- प्रफुल्ल म. शिंदे
                       अकोला, 9158568856

Meri manjil

" मेरी मंज़िल "

ऐ रास्ता लें चल मुझे कहीँ
मंज़िल मेरी तय हैं के नहीँ
यह देखना हैं मुझे.........

रास्ता नहीँ यह सफ़र हैं जिंदगी का
जिंदगिसे लढकर जितना हैं मुझे
वक्त के सीखे हैं हम सब यहाँ
सबको हराकर जितना हैं मुझे
मंजिल मेरी ...................      (1)

कभी अंगारों से तो कभी काटो से
डटके गुजरकर चलना हैं मुझे
आवाज की बाहों में बाँहें डालकर
मुस्कुराकर चलना हैं मुझे
मंजिल मेरी ..................       (2)

पीछे मुडने का वजूद ना हों कभी
उस वजूद को मिटाकर हँसना हैं मुझे
कयामत की रातें याद ना आये कभी
उन यादों को भुलाकर हँसना हैं मुझे
मंजिल मेरी ..................       (3)

शिकस्त की बाजी पलटकर
फतेह हांसिल करनी हैं मुझे
मंजिल मेरी तय हैं के नहीँ
यह देखना हैं मुझे...........       (4)

                 :- प्रफुल्ल म. शिंदे
                    अकोला, 9158568856

Awhan

" आव्हान "

नेते आम्ही नाही की राष्ट्र निर्माते ही नाही
आम्ही शूर सैनिक आहोत त्यांचे
ज्यांच्या केवळ नावाने शहारे येतात
जे येथील लोकांचे आदर्श आहेत

त्यांचाच वारसा टिकवून ठेवण्यासाठी
असलेले हे आमचे अथक प्रयत्न
धनुष्याच्या टनकराने ठिणगी उडाली आहे
फक्त वणवा पेटायची वाट आहे

सुरुवात तर तेव्हाचीच होती
जेव्हा सोळा वर्षाच्या युवकाने
तोरणागड जिंकून पाया निर्माण केला
आता तर उंच मनोरे उभारतो आहे

प्रत्येकाच्या मनांत, नसांतिल रक्तात
ही आग धगधगत ठेवायची आहे
केवळ स्वराज्याचे सुराज्य व्हावे म्हणून
युवकांसाठी असलेले हे एक आव्हान

                :- प्रफुल्ल म. शिंदे
                   अकोला, 9158568856

Vilakshan prem kahani

"विलक्षण प्रेम कहानी "

नविन नविन कॉलेज होत
साधारण वीशीतल वय होत
पहिल्याच दिवशी कॉलेज ला आलो
ती पण आली
ती मल दिसली मी तिला दिसलो
नजरा नजर झाली अन्
अफवा चौफेर उडाली

एक दिवस होता पावसाचा
उभी होती पावसात चिम्ब भिजत
मला वाटलं जाव, बाजूला उभं रहावं
हात देऊन हातांत घ्यावं घट्ट मिठीत
मग मी स्वतःलाच चिमटा घेतला
भविष्यात असं कधी होनार नाही
अन् झालं तर आपल काही खर नाही
तिची लाइन चालू होती
तीची लाइन चालू होती
माझीच कुठे भरकटलि

एक दिवस मी तिला वर्गात पहिल
मागे होती बसलेली
बहुतेक होती रुसलेली
हातात तोंड की तोंडावर हात
होती रूमालात गुंतलेली
डोळे तिचे पाणावलेले
अन् गालावर अश्रूंचा पूर
वर्ग सुटला, शिक्षक गेले
उरलो फक्त आम्ही दोघं
मी हळुच तिला विचारलं
काय झाल असं रडायला
ती काही बोलली नाही
पण तिचे डोळे बरंच काही बोलून गेले
माझ्या ह्रूदयात तीच छोटसं
घर करून गेले,

आठ दिवसांनी पुन्हा भेटली
चेहरा हसरा पण डोळ्याने रडत होती
थांबली,सावरली हळुवार बोलली
"गेले कित्येक दिवस मन कस एकट होत.
जळायच,फुगायच,रुसायच
आणि म्हणायचं आता
कधी मनापासून प्रेम शक्य नाही
पण आता कुणीतरी आलय
म्हणून मन रडतय"
मी समझुन गेलो
ठिणगी पडली,आग लागली
वाटलं ती आग विझणार नाही
पण नियतीला काहीतरी वेगळंच
मान्य होत

ती दिवाळी ला घरी जाणार म्हणून
सोबत स्टेशन वर सोडायला गेलो
पोहोचेपर्यँत ती शांत रहिली अश्रू ढाळत
नक्की माहीत नाही पण
तीच कुणीतरी येणार होत

बाहेर कडाक्याची थंडी होती
एक चादर,दोन स्वेटर थंडी
काही जात नव्हती
तीच कुडकुडन मला दिसल
म्हनून स्वेटर तिच्या अंगावर घातलं
नंतर समजलं ते कुड्कुडन नसून
तिचे हुंदके होते
ती काहीतरी पुटपुटत होती
पण बोलायची हिम्मत होत नव्हती

इतक्यात एक गाडी आली
गाडीतून एक देखणा तरूण उतरला
तो जवळ आला तिला घेऊन गेला
गाडीत पाय टाकताना
तिने हळुच ओढणी सरकवली
तिच्या गळ्यातल 
मंगळसूत्र मला दिसलं
अन् एवढ्या थंडीत गारठलेला मी
एका क्षणात तापलो
एक क्षणात तापलो

शेवटची नज़र मिळालीच नाही
आता त्याचा काही अर्थही नव्हता
पण मला समजलं
हे एक हळव प्रेम होत
तिला हे कळल आणी मला वळल.

                :- प्रफुल्ल म. शिंदे,
                   अकोला, 9158568856