Tuesday, 7 January 2020

Barish

एक ताज़ा शेर,

तुझे देखने की ख्वाईश
दिल मॆं छुपाता हूँ
तुझे मिलने की गुज़ारिश
दिन रात करता हूँ
हैं जो कोई बात तुझमे
तेरी तरफ़ खींचा चला आता हूँ
इश्क की ये जो बारिश हैं
बनकर मै बरसना चाहता हूँ
बनकर मै बरसना चाहता हूँ...........

      #Prafullashinde

Wednesday, 3 January 2018

Samarpan

आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना समर्पित :-

         "समर्पण"
एकदा सहज एक फुल
माझ्या ओंजळीत पडले
आणि म्हणाले,
" तरुणा जरा बघ माझ्याकडे
या ताज्यातवान्या सुगंधित पाकळ्या
फक्त काही वेळ, दुसऱ्यांसाठी
तुमच्यासाठी असलेले माझे हे अस्तित्व .
          निसर्गाच्या सानिध्यात
इतर फुलांसोबत डोलण्यासाठी,
गार वाऱ्याचा उपभोग घेण्यासाठी
आता मी नाही,
माझ्या जीवनाचा पुढील काही वेळ
तुमच्यासाठी .
           एक पूर्ण उमळलेलं फुल
त्याच ध्येय मातीत मिसळण्यासाठी
बलिदानाने मातीलाही सुगंधित
करण्यासाठी.
         हे समर्पण केवळ दुसऱ्यांसाठी!"

Chand

रात को एक चाँद मिला
वो भी आँखों से भिगा भिगा,
धीरे धीरे बादलों ने उसे
अपनी बाँहों मे ले लिया
मै आखरी तक उसको देखतां रहा ~

क्या फिर कभी वो दिखायी देगा ?
      मैंने अपने मन से पुछा
  तो अंदर से आवाज़ निकली -
              "नहीँ"
       मैं घबरा सा  गया
"क्यो आते है ऐसे चाँद जीवन मे"
कुछ पल की ख़ुशी देकर
सारी जिंदगी ग़मो के साये देते है

वैसे चाँद तो कल भी निकलेगा
बादल कल भी आयेंगे
वो फिर डूब जायेगा
कुछ पल की रौशनी देकर

पर वो चाँद सबसे अलग था
मासूम, भोला, चेहरे पर मुस्कुराहट
आँखों मे नमी, होंठों पे शबनम
वाह ! क्या बात थी यार.......

सोचते सोचते कब सूरज निकल आया
पता ही नहीँ चला.......

                          - प्रफुल्ल शिंदे

Viskatleli ratra

"विस्कटलेली रात्र"
अशा कितीतरी रात्री घालवल्यात मी तुझ्याबरोबर,
तुझे कुरळे केस कूरूवाळत,
तुझ्या अतीव सुंदर सजलेल्या
फुलागत चेहऱ्यावर स्पर्श करताना
मला म्रुगजळाचा भास व्हायचा
तुझ्या गोड गोष्टींनी मला
सर्व जग फिके वाटू लागले
चंद्राच्या सौम्य प्रकाशात
तलावाच्या काठावर बसून
भाकर्या खेळत  तासंतास गप्पा करत
ह्या रात्रीनी कधी मला तुझ्या प्रेमात पाडले
काही कळालेच नाही
मी ऊरलोच ना आता माझ्यात काही
तरीच तरीच तरीच
मी म्हणालो होतो माझ्याशीच
का वाटतंय हे सर्व जग मला आपलंसं
हों, आता जगावंस वाटतंय,
प्रत्येक रात्रीत तुझी सोबत असताना
पण, पण, पण,
एका रात्री,
जस सुसाट सुटलेल्या पिसाळलेल्या जनावराने
उभ्या पीकाची नासाडि करावी
तस विषारी सापाने डंख मारल्यागत
मला त्या स्वप्नातून जाग केलं
अन् समोर दिसलं ते फक्त भकास छप्पर
आणी उभ्या निर्जीव भिंती...........

               - प्रफुल्ल शिंदे
                     अकोला.

Prashnarthak prem

" प्रश्नार्थक प्रेम "

प्रेमाची व्याख्या...फारच कठीण असते ना ?  प्रत्येकाच्या तर्हेने वेगवेगळ्या भाषेत समंजसपने लिहिलेली वा समजून उमजलेली ही एक संज्ञा असते. पौराणिक कथांमध्ये ऐकलेल्या राजा राणीच्या प्रेमाच्या संज्ञा पाश्चिमात्य देशांत घडलेल्या रोमीओ ज्युलियट च्या प्रेमापेक्षा काहीतरी वेगळ्या होत्या.
         याउलट भारतीय प्रदेशात घडलेली लैला मजनु या प्रेमीयुगुलान्ची गाथा महाभारतातील राधाकृष्णानांच्या प्रेमाला तोड़ देतील इतकी अस्सल होती. हे झाल एका मर्यादित वर्गासाठि, बहुधा याला प्रेमापेक्षा आकर्षण म्हणणे सोईस्कर ठरेल, यात शंका नाही.
       एखाद मूल आई पासून दूर जात असेल त्यावेळी आईच्या काळजात होणारी घालमेल हे तीच त्या बळावरच आत्यंतिक प्रेम दाखवुन देत किंवा ती आई आपल्या बाळाला स्वतःपासून दूर न करण्यासाठी त्याला बिलगून बसते. हे प्रेमाच अस रूप आहे जे कोणत्याही प्रेमीयुगुलांच्या प्रेमापेक्षा कितीतरी पटींनी मोठं असतं.
              -प्रफुल्ल शिंदे

Jatiwad

"जातिवाद"

मी एकदा सभेत बोललो
जातिवाद अजूनही सम्पला नाही
तर माझ्यावर नाराजीचे सूर उठले
मी फक्त उल्लेख केला
संविधानातील समाजवादाचा
तर माझ्यावर तलवारी ऊपसल्या गेल्या
मग मी प्रतिप्रश्न केला त्यांना
हेच का आपल अभिव्यक्ती स्वातंत्र्य
कुठे हरवली समाज बांधिलकी
अरे विचारा जाऊन त्या लोकांना
ज्यांना दोन वेळच अन्न मिळत नाही
ज्यांना अजूनही आधुनिकता उमगली नाही
त्यांची काय परिस्थिती असेल
समोरची सभा अगदि शांत
जणू काही झालंच नाही या आविर्भावात
हक्क मिळत नसेल
न्याय मिळत नसेल
तर तो हिसकावुन घ्यावा
दीन, लाचार जगण्यात काय अर्थ
जातिवादावर राजकारण करून
मतान्ची दलाली मिळवनार्याँनो
आता वेळ आली आहे
'जातिवाद' मुळांपासून नष्ट करण्याची
तेंव्हा सज्ज व्हा !!!!

          - प्रफुल्ल शिंदे, अकोला

Alvida 1

कॉलेज कट्ट्यावर लिहिलेली कविता ..........
फॉर KK-series

"अलविदा"

जाने क्या साथ ले जायेंगे
जान यहीं पर छोडके
दिल दोस्ती दुनियादारी
सब रिश्ते बंधन तोडके (1)

साँस अटकी हैं मेरी इन
पत्थरों की दीवारों में
साथ बिताये चार साल
उन सभी मेरे यारो मे (2)

दिन जाने का खुदाने
गर तय किया होता
लौटकर आने का फिर
इरादा ना किया होता (3)

खयाल रखना दोस्तों
जिन्दगीका हँसते हंसते
कोई सफ़र जिंदगी का
चलना आहिस्ते आहिस्ते (4)

जाने का यहाँ से अब भी
कीसीका जी नहीँ करता
चलो कहे अलविदा यारो
वक्त तो कभी नहीँ ठहरता (5)

- प्रफुल्ल शिंदे