Wednesday, 3 January 2018

Khota paus

"खोटा पाऊस "

नजरेस आज तुझ्या
नजर लावताना
भटकलेच हे डोळे
तुझ्यात हरवताना

श्वास बंद व्हावा
काळीज धडधडावे
तुला दूर सारताना
मन का हे रडावे

मेघ गर्जना झाली
आकाशात वीज कडाडली
पाऊस बरसला नाही
मात्र ढग एकमेकांना भिडली

पाऊले पुढे सरकली
ती मागे फीरलीच नाही
वाटले एकदा तू बदलशील
तू मात्र बदललीच नाही

    -  Prafulla Shinde

No comments:

Post a Comment